आमच्याबद्दल

नमस्कार,

मी अभिषेक.

मी मार्केटिंग आणि सेल्स कन्सल्टंट आहे.

गेल्या १० वर्षांपासून मी विविध प्रकारच्या जाहिराती, कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडीओ मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग इ. विषयांवर व्यावसायिक मार्गदर्शन करतो.

मार्केटिंग आणि सेल्स विषयीच्या अनेक उपयुक्त गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध आहेत, पण मराठीत उपलब्ध नाहीत. अशा महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती मराठी भाषेतून देता यावी, केवळ शहरातीलच नव्हे तर गावाकडील छोट्या उद्योजकांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा, म्हणून हा ब्लॉग लिहीत आहे. 

इंग्रजी जगाची भाषा असल्याने ती बोलता यायला हवीच, पण जोपर्यंत ती आत्मविश्वासाने बोलता येत नाही, तोपर्यंत मराठी उद्योजकांनी त्या उपयुक्त सोई-सुविधांपासून वंचित राहू नये म्हणून मराठीतून व्यावसायिक सेवा पुरवणे गरजेचे आहे.

तुमच्या व्यवसायाच्या/उद्योगाच्या वाढीसाठी जर तुम्हाला मार्केटिंग व सेल्स विषयी काही सेवा हवी असल्यास नक्की संपर्क करा.

मी पुढील प्रकारच्या सेवा पुरवतो:


  • तुमच्या बिझनेससाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करणे 
  • तुमच्या बिझनेससाठी सेल्स सिस्टीम तयार करणे 
  • तुमच्या बिझनेससाठी जाहिरातीचा मजकूर लिहून देणे. 
  • मालाची विक्री वाढावी म्हणून नेमक्या काय सुधारणा करायला हव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणे  
  • तुमच्या कंपनीसाठी अर्थपूर्ण व योग्य नाव सुचवणे आणि स्लोगन/ टॅगलाईन लिहिणे  
  • तुमच्या सेवा व उत्पादने यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून योग्य किंमती ठरवणे 
  • तुमच्या सेवांची विविध पॅकेजेस तयार करणे 
  • तुमच्या बिझनेसच्या वेबसाईटचे व्यावसायिक दृष्ट्या समीक्षण करणे (म्हणजे तिथे काय काय असायला हवं, कसं असायला हवं, थीम, रंगसंगती, त्यावरचा विक्री मजकूर, जाहिरात मजकूर, इ.) 
  • सोशल मीडिया मार्केटिंग कसं करावं? 
  • तुमच्या बिझनेसच्या इंडस्ट्रीनुसार कुठल्या प्रकारचं मार्केटिंग जास्त चांगले रिझल्ट्स देऊ शकतं? हे पाहणं. 
  • विक्री वाढवण्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरणाऱ्या व्हिडीओ मार्केटिंग चा वापर करणे 


इथे संपर्क करा.



Related Posts Plugin for WordPress, Blogger...